BusinessMust Read

Personal loan rbi new rules पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोन साठी RBI ने बदलले नियम! आता हे लोन मिळणे कठीण होणार; पहा नवीन नियम..

Personal loan RBI on Unsecured Loan: भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने वैयक्तिक कर्जांसाठी संबंधित नियमांमध्ये कडक सुधार केले आहे. त्या सुधारित नियमांमध्ये, जोखीम वजन २५% पर्यंत वाढवण्यात आले आहे, परंतु गृहकर्ज, शिक्षण आणि वाहन कर्जांसह काही ग्राहक कर्जांना हे नियम लागू होणार नाहीत. खर्चात वाढ आणि ठेवी कमी होण्यामुळे कोणताही आर्थिक धक्का आल्यास कर्ज बुडण्याची शक्यता वाढली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) शेवटच्या पतधोरण आढावा बैठकीत केंद्रीय बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकिंग क्षेत्रातील वाढत्या असुरक्षित कर्जाबद्दल चिंता व्यक्त केली. आता रिझवर्ह बँकेनेच नियमांमध्ये कडकपणा जाहीर केला आहे (rbi latest news). क्रेडिट कार्ड किंवा वैयक्तिक कर्ज, आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक या साधनांचा वापर करत आहेत. आपण बघितले तर मागील काही वर्षांमध्ये क्रेडिट कार्डचा ट्रेंड अगदी झपाट्याने वाढत चालला आहे. अशावेळी बऱ्याच लोकांना दैनंदिन जीवनामध्ये त्याचा अगदी नियमितपणे वापर झाल्याचा दिसत आहे.

परंतु, आता आगामी दिवसांत क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक करंजांसाठी कठीण होणार आहे कारण रिझर्व्ह बँकेने वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्डसह किरकोळ कर्ज श्रेणी उत्पादनांसाठी नियम कडक केले आहे.

Personal loan वैयक्तिक कर्ज आता महागणार..


बँक आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी (NBFC) असुरक्षित मानल्या जाणार्‍या वैयक्तिक कर्जाशी संबंधित नियम रिझर्व्ह बँकेने गुरुवारी कडक केले आहेत (rbi information in marathi). सुधारित नियमांमध्ये जोखीम वजन २५% पर्यंत वाढवण्यात आले असून आरबीआयने सांगितले की, पुनरावलोकनाच्या आधारे कर्ज प्रकरणातील जोखमीच्या संदर्भात जोखीम वजन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या नियमांतर्गत आरबीआयने बँक आणि NBFC साठी जोखीम वजन २५% वाढवून अनुक्रमे १५० टक्के आणि १२५ टक्के केले आहे.

Which loans कोणत्या कर्जांवर नियम लागू नाही?

कर्जे साधारिता दोन प्रकारचे असतात – सुरक्षित कर्ज आणि असुरक्षित कर्ज. सुरक्षित कर्ज म्हणजे ज्यात कर्जाच्या बदल्यात बँक किंवा NBFC कडे काही तारण ठेवले जाते. जसे की गोल्ड लोन, कार कर्ज, गृहकर्ज, मालमत्ता कर्ज इत्यादी सुरक्षित कर्जाची उदाहरणे आहेत (rbi new rules). तर अशावेळी वैयक्तिक कर्ज या सोबतच क्रेडिट कार्ड च्या बाबतीमध्ये आपण एन बी एफ सी यांच्याकडे कोणताही तारण नसते. म्हणूनही यांना या अंतर्गत असुरक्षित कर्ज म्हणत आहे. आरबीआयने स्वतः आपल्या निवेदनामध्ये असे स्पष्ट केले आहे की, तरतुदी प्रमाणे करण्यात आलेले बदल शिक्षण गृहनिर्माण वाहन कर्ज यांना लागू होत नाहीत.

रिझर्व्ह बँकेच्या ह्या कडक पावलाने आता आलेल्या काळात लोकांना वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळण्यात अडचणी येऊ शकतात कारण त्याने तरतुदीसाठी कडकपणे केल्यामुळे बँक आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांकडून कर्ज देण्यासाठी कमी भांडवल शिल्लक राहील.

जास्त जोखिम वेट म्हणजे काय?

जास्त जोखिम वेट म्हणजे असुरक्षित मानल्या जाणार्‍या वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत बँकांना जास्त रक्कम बाजूला ठेवावी लागते. सोप्या शब्दात माहिती घ्यायची झाली तर, हे सर्व वेट बँकेच्या कर्ज देण्याची क्षमता मर्यादितपणे निश्चित करत आहे. 

Bank Strike Update 2023 बँक कर्मचाऱ्यांची डिसेंबरपासून १३ दिवसांसाठी बंदीची हाक, ग्राहकांवर होईल परिणाम; पहा महत्वाची बातमी..

Personal loan
Personal loan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button