Agriculture

Tar Kumpan Yojana संपूर्ण शेताला तारेचे कुंपण करा, सरकार देत आहे 90% सबसिडी; या शेतकऱ्यांनी त्वरीत अर्ज करा-

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना जंगली आणि पाळीव प्राणी पासून होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी आपल्या शेतामध्ये तारकुंप करून शेतीचे संरक्षण करण्यासाठी सरकारने एक योजना आणलेली आहे व या योजनेचे नाव आहे तार कुंपण योजना ( tar kumpan Yojana).

महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून शेतीसाठी काटेरी तार कुंपण लावण्यासाठी जवळपास 90 टक्के पर्यंत अनुदान प्राप्त करून दिले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी तारकुंपण योजनेचा लाभ घ्यावा असे सरकारकडून आव्हान देखील करण्यात आलेले आहे ( tar kumpan Yojana Maharashtra).

तर मित्रांनो आज आपण या लेखामध्ये तार कुंपण योजना 2023 या योजनेबद्दल ची सर्व माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण अर्ज कोठे करायचा, त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, या अनुदानामागे सरकारचे उद्देश काय आहे हे सर्व माहिती आपण आज या लेखांमध्ये घेणार आहोत.

मित्रांनो ही योजना डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येणार असून यामध्ये काटेरी तार कुंपण योजना महाराष्ट्र याच्या अंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये काटेरी तार कुंपण लावण्यासाठी सरकारकडून 90 टक्के अनुदान प्राप्त करून दिले जात आहे (tar kumpan Yojana 2023).

Tar Kumpan Yojana या योजनेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत

1. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शेताला तारेचे कुंपण करून जंगली जनावरांपासून तसेच वन्य प्राण्यांपासून तुमचे व तुमच्या शेताचे संरक्षण करू शकता.

2. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान देखील कमी होऊ शकते.

3. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या वतीने 90% पर्यंत अनुदान देखील पुरवण्यात येणार आहे.

या योजनेच्या अटी व नियम कोणकोणते आहेत?

1. जर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हवा असेल तर त्या जागेवरती अतिक्रमण केलेलं नसाव.

2. शेतकऱ्यांनी जे क्षेत्र निवडलेले आहे ते वन्य प्राण्यांचे नैसर्गिक भ्रमण मार्गामध्ये नसले पाहिजे.

3. सदर जमिनीचा वापर हा पुढील दहा वर्षे बदलता येणार नाही असा ठराव देखील तुम्हाला समितीला सादर करावा लागेल.

4. जर शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ घ्यायचा असेल तर त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात होणाऱ्या नुकसानाचा प्रमाणपत्र अर्ज देखील सादर करावे लागेल.

5. या योजनेच्या माध्यमातून 2 क्विंटल काटेरी तार सोबतच 30 खांब 90 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहेत. उर्वरित दहा टक्के रक्कम हे शेतकऱ्यांनी स्वतः भरायची आहे.

Tar Kumpan Yojana या योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

  1. अर्जदारांचा आधारकार्ड (Aadhar Card)
  2. जमिनीचा ७/१२ उतारा (Land Record)
  3. गाव नमुना 8अ
  4. जातीचा दाखला
  5. शेतमालक एकापेक्षा जास्त असल्यास त्याबद्दलचा
  6. सहमतीपत्र
  7. ग्रामपंचायतचा दाखला
  8. समितीचा ठराव
  9. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र

या योजनेसाठी अर्ज कोठे करावा

तार कुंपण योजना 2023 या योजनेसाठी अर्ज करण्यास करायचा असेल तर संबंधित पंचायत समितीमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल.

विहित नमुन्यातील अर्ज सोबत शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व कागदपत्रे पंचायत समितीला सादर करावी लागतिल.

त्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाईल आणि निवडलेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या अटी व शर्तीनुसार अनुदान प्राप्त होईल. 

pik vima yojana पावसाचा खंड पडला असेल तर किती रुपयांची भरपाई मिळायला हवी? पहा सविस्तर माहिती..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button