Today News 2024 ; नव्या वर्षात ‘या’ चार बँकांच्या कर्जदारांचा ईएमआय वाढला, पहा सविस्तर
आजच्या बातम्या 2024 ; नव्या वर्षात ‘या’ चार बँकांच्या कर्जदारांचा ई एम आय वाढला, जाणून घ्या सविस्तर.
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक ( पीएनबी ) आणि आयसीआयसीआय बँक सह 4 बँकांनी कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. एक जानेवारीपासून हे दर लागू झाली आहे. आय सी आय सी आय बँकेने सर्वाधिक 0.10 टक्के वाढ करण्यात आली आहे.
त्या अगोदर थोडं महत्त्वाचा वाचा:
अशाच नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा 👈🏻
Punjab National Bank :
पीएनबीच्या एक महिन्याच्या कर्जावरील व्याजदर 7.25 टक्क्यावरून 7.30 टक्के झाले आहे. एक वर्षाचा कर्ज व्याजदर 8.64 या टक्क्यावरून 8.70 टक्के झाला आहे. पीएनबीने ठेवीच्या व्याज दरातही वाढ केली आहे. 271 ते 1 वर्षाच्या ठेवीवर 6.25 टक्के व्याज मिळेल. 400 दिवसाच्या ठेवीवर दर 6.80 टक्क्यावरून 7.25 टक्क्यावर आला आहे.
ICICI Bank :
आयसीआयसीआय बँकेने 1 महिन्याच्या कर्जाच्या व्याजदरावर 8.6 टक्क्यावरून वाढवून 8.7 टक्के केला आहे. 1 वर्षाच्या कर्जावरील व्याजदर 9 टक्क्यावरून 9.10 टक्के करण्यात आला आहे.
Bank of India:
बँक ऑफ इंडियाच्या सहा महिन्याच्या कर्जव्याज दरावर 8.60 टक्के, एक वर्षाच्या कर्जावर 8.80 टक्के, तर एका रात्रीच्या कर्जासाठी 8 टक्के व्याज द्यावे लागेल.
Yes Bank :
येस बँकेच्या एक वर्षाच्या कर्ज व्याजदरावर 10.5 टक्के, एका रात्रीच्या कर्ज व्याजदर 9.20 टक्के आणि सहा महिन्याच्या कर्जव्याज दरावर 10.25 टक्के व्याज द्यावे लागतील.
अजून वाचा
Job Vacancy : पदवीधारांसाठी नोकरीची संधी! 250 पदांवर बंपर भरती, झटपट करा अर्ज
उरले फक्त 3 दिवस, 1 जानेवारीपासून कारच्या दरात होणार वाढ, ‘या’ कंपन्या वाढणार दर