Blog

benefits of gold loan पर्सनल लोन पेक्षा सोनेतारण कर्ज कसे ठरते फायद्याचे? वाचा सोनेतारण कर्जाची ए टू झेड माहिती;

 

Gold loan information | आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या आर्थिक गरजा अचानक उद्भवतात किंवा बऱ्याचदा एखादा मोठे संकट येऊन कोसळते. अशा आणीबाणीच्या प्रसंगी माणसाजवळ पुरेसे पैसे नसतात. या सर्व गोष्टींमुळे बरेच जण त्यांच्या मित्र किंवा नातेवाईक, सावकार यांच्याकडून पैशाची गरज भागवतात.

यालाच दुसरा पर्याय म्हणजे विविध बँका किंवा इतर वित्तीय संस्थेच्या माध्यमातून कर्ज घेतात. त्यामुळे बरेच जण यासाठी वैयक्तिक कर्ज देखील घेतात (benefits of gold loan). परंतु अधिक संकटाच्या वेळी तर तुम्हाला अचानक पैशाची गरज असेल तेव्हा तुम्ही तुमच्या घरात जर सोन असेल तर ते तुम्हाला खूप मदत करू शकते.

Benefits of Gold loan गोल्ड लोन का आहे फायद्याचे?

1) कमी नोटीस वर कर्ज मिळते:-  जर आपल्याला अचानकपणे इमर्जन्सी पैशाची गरज असेल अशा आणीबाणीच्या वेळी कर्ज मिळणे हे खूप कठीण असते परंतु तुम्ही गोल्ड लोन च्या माध्यमातून अगदी कमीत कमी नोटीस वर कर्ज मिळवू शकतात.

2) कर्जासाठी सुलभ निकष:- तुम्ही बँकेच्या माध्यमातून किंवा इतर संस्थेच्या माध्यमातून तुमचे कर्ज घेतात. त्याच्या निकषापेक्षा गोल्ड लोणचे निकष हे खूप सोपे असते. गोल्ड लोन मुळे तुमचा सिबिल स्कोर किंवा इतर आर्थिक क्रायटेरियामध्ये देखील जास्त काही फरक पडलेला दिसून येत नाही. यामध्ये तुम्ही देत असलेल्या तुमच्या सोन्याच्या किमतीनुसार तुम्हाला कर्ज हे प्राप्त करून दिले जाते.

3) कमी व्याज दारात कर्ज उपलब्ध होते:- आर्थिक आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये आपण पर्सनल लोन किंवा प्रॉपर्टी लोन किंवा कॉर्पोरेट कर्ज इत्यादी प्रकारचे कर्ज घेतो. या सगळ्या कर्जाच्या तुलनेमध्ये जर आपण गोल्ड लोन च्या व्याजदर असा विचार केला तर ते कमी असते. म्हणजेच याचा माध्यमातून आपल्याला कमीत कमी व्याजारामध्ये कर्ज उपलब्ध होते.

4) कर्जाच्या परतफेडीचे आहेत अनेक पर्याय:- जर तुम्ही गोल्ड लोन घेतले तर तुम्हाला लोन परतफेडीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले जातात. एखादे उदाहरण पाहायचे झाले तर तुम्ही फक्त व्याजदर देखील दर महिन्याला जमा करू शकता.

गोल्ड लोन घेण्यासाठी कोण कोणत्या अटी आहे?

१) गोल्ड लोन घेण्यासाठी तुमची वय हे कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 75 वर्ष याच्या दरम्यान असले पाहिजे.

२) कर्जदाराला तारण म्हणून किंवा हमी म्हणून देण्यासाठी सोने किंवा दागिने उपलब्ध असणे गरजेचे आहे (eligibility criteria for gold loan).

३) सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जे सोने देता त्या सोन्याचे शुद्धता ही 18 कॅरेट पेक्षा जास्त असली पाहिजे.

गोल्ड लोन घेताना ही गोष्ट लक्षात ठेवा

सर तुम्ही गोल्ड लोन घेतले आणि त्या लोणचे परतफेड वेळेवर ती केली नाही तर ती संबंधित संस्था किंवा कंपनी तुमचे सोने विकू देखील शकते व त्या प्रकारचा अधिकार त्यांना दिला जातो (important tips for gold loan). दुसरे म्हणजे जर सोन्याची किंमत कमी झाली तर कर्ज देणारा तुम्हाला जास्त सोने गहाण ठेवण्यासाठी देखील सांगू शकतो आणि त्यामुळे अल्प कालावधीत पैशाची गरज आहे तेवढेच लोन काढावे आणि त्याची परतफेड सुद्धा वेळेवरती करावी.benefits of gold loan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button