कापूस बाजारभाव
२०२३-२४ यावर्षी कापसाचे भाव घटण्याचा अंदाज… कापसाचे भाव वाढणार का ? जाणून घ्या..
कापूस हंगाम २०२३-२४ संपेपर्यंत संस्थेने आपला एकूण कापूस पुरवठा अंदाज ३४५ लाख गाठींवर कायम ठेवला आहे. उत्पादनाचा अंदाज कमी असल्याने यंदा आयात जास्त होण्याची अपेक्षा आहे, असे गणात्रा म्हणाले.
WhatsApp Group 👈🏻 जॉईन करा
मुंबई : बहुतांश उत्पादक भागात कमी उत्पादन झाल्यामुळे सध्या सुरू असलेल्या हंगामात कापसाचे उत्पादन सुमारे आठ टक्क्यांनी घसरून २९४.१० लाख गठडी होण्याचा अंदाज इंडियन कॉटन असोसिएशनने व्यक्त केला आहे. मंगल वर्षाच्या हंगामात ( ऑक्टोबर – सप्टेंबर ) एकूण कापूस उत्पादन ३१८.९० लाख गाठी ( १७० किलो ) झाले होते.
देशाच्या उत्तरेकडील भागात ‘ पिंक बॉल वर्म ’ या किडीच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी उत्पादन २४.८ लाख गाठीनी घटून २९४.१० लाख गाठींवर येण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर एक ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत जवळपास १५ ते ४५ दिवस पाऊस न पडल्याने दक्षिण आणि मध्य भागातील उत्पन्नावरही परिणाम होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले. यावर्षी नोव्हेंबर अखेर एकूण कापूस पुरवठा ९२.०५ लाख गाठी होण्याचा अंदाज आहे. यामध्ये ६०.१५ लाख गाठींची आवक, तीन लाख गाठींची आयात आणि सत्राच्या सुरुवातीला २८.९० लाख गाठींचा प्रारंभिक साठा समाविष्ट आहे.