| गो – ग्रीन योजनेमुळे वीज ग्राहकांची 25 लाखांची बचत |
छत्रपति संभाजीनगर :
महावितरणच्या ‘गो ग्रीन’ योजनेअंतर्गत वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर बंद करत केवळ ई-मेल व एसएमएस हे पर्याय निवडणाऱ्या छत्रपती संभाजी नगर मधील पर्यावरण स्नेही २० हजार ४१२ ग्राहकांकडून २५ लाख ४९ हजार ४४० रुपयांची वार्षिक बचत सुरू आहे.
महावितरणाच्या गो-ग्रीन योजनेनुसार ग्राहकांनी छापील विज बिलाच्या ऐवजी ईमेल व एसएमएस चा पर्याय निवडल्यास प्रति बिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांची वार्षिक बचत १२० रुपये होत आहे. विज बिल तयार झाल्यानंतर लगेच संगणकी प्रणालीतून गो-ग्रीन सहभागी वीस ग्राहकांना तो ईमेल द्वारे पाठवण्यात येत आहे. सोबतच एसएमएस द्वारे वीज बिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्प्ट पेमेंटचा लाभ घेणे शक्य झाले आहे. गो-ग्रीन योजना ही काळाची गरज आहे. वीज ग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे व पर्यावरणाला योगदान द्यावे, हे विधान डॉ. मुरहरी केळे यांनी दिला आहे. छत्रपती संभाजी नगर परिमंडलांतर्गत छत्रपती संभाजी नगर शहर गो-ग्रीन योजनेत १० हजार ६२७ वीज ग्राहक सहभागी होत आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण गो ग्रीन मंडलात ४ हजार ६०९ ग्राहक सहभागी झाले. तसेच जालना मंडळातील ३ हजार ३७६ वीज ग्राहकांनी गोग्रीन या योजनेत सहभाग घेतला. महावितरणाचा गो-ग्रीन हा पर्याय निवडण्यासाठी वीस ग्राहकांनी छापील बिलावरील जी जी एन ( GGN ) या १५ अंक क्रमांकची नोंदणी महावितरणाच्या ॲप मध्ये किंवा महावितरणच्या संकेतस्थळावर करावे.
गो ग्रीन योजनेस सहभागी झालेल्या सर्व वीज ग्राहकांना छापील वीज बिलाची गरज भासल्यास त्यांनी ई-मेल द्वारे प्राप्त झालेली माहिती संगणकाच्या प्रणालीमध्ये साठवून ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू विज बिलासह मागील ११ महिन्याची वीज बिल उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार ग्राहक ते कधीही डाऊनलोड करू शकतात किंवा मूळ स्वरूपात ते रंगीत प्रिंटही करू शकतात.
अधिक वाचा :
“परवडणारा निर्णय : 25 रुपये प्रति ‘ किलो ‘ दराने तांदूळ देण्यासाठी केंद्र सरकारचा धाडसी पाऊल”
मुख्यमंत्री ग्राम कृषी उद्योग योजना पहा सविस्तर माहिती….