Milk Price News 2024 : मोठी बातमी ! दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकार देणार 5 रुपयाचा अनुदान, सविस्तर पाहून घ्या.
Milk Price News : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दुधाला अनुदान देण्यासंदर्भात मंत्री मंडळ बैठकात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. दुधासाठी सरकार 5 रुपयाचा अनुदान देणार आहे. त्यामुळे 5 रुपयाच्या सबसिडी सह दूध उत्पादक शेतकऱ्यांना 32 रुपयाचा दर मिळणार आहे. हे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा आहे असं म्हणावं लागेल.34 रुपयाचा दर ठरल्यास दूध संघांना शेतकऱ्यांना 29 रुपये प्रति लिटर दर द्यावा लागणार आहे.
त्या अगोदर थोडं महत्त्वाचं वाचा :
अश्याच नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा 👈🏻
29 फेब्रुवारी पर्यंत हा नियम लागू
राज्यातील सरकारी दूध संघमार्फत ही अनुदान योजना राबवण्यात येईल. सहकारी दूध संघांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.2 फॅट/8.3 एस एन एफ या प्रति करीता किमान 29 रुपये प्रति लिटर इतका दर बँक खात्यावर जमा करावा लागेल. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत 5 रुपये प्रति लिटर अनुदानाप्रमाणे दोन महिन्यासाठी 135 कोटी 44 लाख इतके अनुदान आवश्यक असेल. ही योजना 1 जानेवारी ते 29 फेब्रुवारी पर्यंत राबवण्यात येईल. राज्यात दूध दराच्या संदर्भात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे मंत्री बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर हे अनुदान देण्यात आले.
नागपूर अधिवेशनात मंत्री विखे पाटलांनी केली होती घोषणा
राज्यातील सरकारी दूध संघमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दुधासाठी दूध उत्पादकास 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्यात यावे ही घोषणा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनात केली होती. ही योजना फक्त राज्यातील सहकारी दूध उत्पादक पतसंस्था यांच्यामार्फत घडवण्यात यावे असे त्यांनी म्हटले होते. मात्र, घोषणेनंतर कोणताही आदेश अद्याप निघाला नव्हता. दरम्यान, आज मंत्री मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्यात यावे असा निर्णय घेतला आहे. राज्यातील 72 टक्के दूध खाजगी संस्थांना दिले जाते आणि सरकारने दिलेलं अनुदान फक्त सहकार्याला आहे. त्यामुळे बहुतांश दूध उत्पादक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले जातात. त्यामुळे सरकारने सर्वांनाच अनुदान द्यावं, अशी मागणी किसान सभेने केली होती.
अजून वाचा :
Truckers strike : अधिकार्यांच्या आश्वासनानंतर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये ट्रकचालकांनी संप मागे घेतला
६ महिन्यात व्होडाफोन आयडिया कंपनीचा 80% शेअर भाव वाढला