Truckers strike : अधिकार्यांच्या आश्वासनानंतर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये ट्रकचालकांनी संप मागे घेतला, बघा काय आहे त्या घडामोडी.
सोमवारी देशातील अनेक राज्यांमध्ये चालू केलेलं ट्रकचालकांचे दुसऱ्या दिवशी ही सुरूच राहिल्याने डेपोमध्ये पेट्रोलियम पदार्थांची डिलिवरी झाली नाही आणि इंधन टंचाईच्या भीतीने लोकांनी पेट्रोल पंपावर जाम गर्दी केली.
नाशिक : ट्रक चालकांनी अपघातग्रस्त रस्त्यावरील आपघतावरील नवीन दंडात्मक कायद्यातील तरतुदीला विरोध करणाऱ्या ट्रकचालकांनी त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याचे आश्वासन तेथील स्थानिक अधिकाऱ्याने दिल्यानंतर मंगळवारी महाराष्ट्रातील नाशिकमध्ये आपला संप मागे घेतला.
महाराष्ट्रातील राजधानी मुंबईसह, नागपूर, कोल्हापूर, धाराशिव, सोलापूर, नवी मुंबई, पालघर, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, गडचिरोली आणि वर्धासह इतर ठिकाणी ट्रकचालकांनी आंदोलन केले आहेत.
नाशिकमध्ये मनमाड येथील पनेवडी येथे इंधन वाहतूकदारांनी आंदोलन सुरू केले. देशव्यापी निषयाचा भाग म्हणून पानवेडी परिसरात 1,000 हून अधिक ट्रक व ट्रॅक्टर उभे होते.
जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मनमाड शहराजवळील पानवेडी गावात भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईलसह अनेक कंपन्यांचे पेट्रोलियम डेपो आहेत. या डेपोमधून अनेक पेट्रोलियम पंपावर इंधन पुरवले जाते. पानवेडी परिसरातील इंडियन ऑईलचा इंडेन LPG बोटलिंक प्लॅन्ट आहे.
सोमवारी या संपामुळे सोमवारी संध्याकाळपासून नाशिक जिल्हा आणि जिल्हातील विविध इंधन केंद्रावरील लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि पोलिस अधिकारी शाहजी उमप यांनी मंगळवारी पानवेदी येथे वाहतूकदार, डीलर्स, पेट्रोलियम, कंपनीचे आधिकारी व इतर संबंधांची बैठक घेण्यात आली होती.जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर काही वाहतूकदारांनी संप माघे घेतला.
अजुन वाचा :
ईदच्या दिवशीचं सिनेमा रिलीज का करतो ‘सलमान खान’ हे कारण आले आहे समोर