Corona JN1 update : WHO चा इशारा 52% नी होतेय वाढ, जगासमोर पुन्हा एकदा मोठे संकट
Corona JN1 upadate WHO WARNING
Corona JN1 update : कोरोनाच्या रूग्णांमध्ये पुन्हा एकदा तीव्र झपाट्याने वाढ होताना दिसतेय, जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अशातच आता JN.1 या नवीन सब व्हेरिएंटमुळे सामान्य जनतेच्या मनात घबराट पसरली आहे.गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 754 नवीन रुग्णआढळल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे.2020 च्या भयानक महामारी ने पूर्ण जग आताच सावरले असताना डब्ल्यूएचओने म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, गेल्या 4 आठवड्यांमध्ये जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत 52 टक्क्यांनी वाढ झाली आहे.Corona JN1 update
या काळात साडे आठ लाख हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे .अशातच नवीन मृत्यूच्या संख्येतही गेल्या 28 दिवसांच्या तुलनेत 8 टक्क्यांनी घट झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर 1600 हून अधिक रुग्ण अती दक्षता विभागात दाखल आहेत.
Corona JN1 update सिंगापुर मध्ये रुग्णांची वाढती संख्य
Singapur update: जगभरात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून सिंगापूरमध्ये सर्वात वाईट परिस्थिती पाहायला मिळत आहे. सिंगापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे सरकारने या ठिकाणी मास्क घालणं अनिवार्य केलं असून लोकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला देण्यात येतोय.
देशात वाढत आहेत कोरोनाचे रूग्ण
COVID JN1:केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण कोविड-19 रुग्णांची संख्या 4.50 कोटी (4,50,07,965) आहे. वृताच्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासात संसर्गामुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच कोरोनाच्या संसर्गामुळे मृतांची संख्या 5,33,332 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 752 नव्या प्रकरणांची नोंद झाली आहे. अशातच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3,420 वर पोहोचली आहे. Covid 19 नंतर हा नवीन varient खूपच घातक ठरू शकतो. सामान्य नागरीकांना सावधान आणि सुरक्षित राहण्याचा इशारा केला आहे. अशा महामारी मध्ये सर्वांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित न करता सरकारला सहकार्य करावे जेणकरून देश लवकरात लवकर या संकटातून बाहेर पडेल.covid JN1 warning.