agrinews24tas.com

Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Yojana नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना

Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Yojana

मागील काही वर्षांपासून पावसाचे असमान आगमन पावसातील मोठे खंड मान्सूनचे उशिरा आगमन होणारे अवकाळी पाऊस गारपीट अशा समस्यांना राज्यातील शेतकऱ्यांना वारंवार सामोरे जावे लागत आहे त्यामुळे राज्यात दुष्काळ सदृश्य वातावरण निर्माण होत आहे आणि पाण्याची टंचाई भासत आहे व कृषी उत्पन्नही मोठ्या प्रमाणात कमी होत आहे घटत्या उत्पन्नामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे यामुळे शेतकऱ्याचे जीवन आणि समृद्ध व्हावे यासाठी नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना महाराष्ट्रात राबवली जात आहे देशमुख कृषी संजीवनी योजनेबद्दल तुम्ही तर ऐकलं असेल या योजनेद्वारे आपल्याला विहीर शेततळे आणि सिंचन उपयोगी साधनांचा अनुदान देऊन वितरण केले जाते हि योजना महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे कोरडवाहू शेतीला प्रोत्साहन देणे व छोट्या शेतकऱ्यांना सिंचन उपयोगी साधनांचे वितरण करून त्यांचे वार्षिक उत्पन्न वाढवणे आहे प्रामुख्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सिंचन उपयोगी वस्तूंचा पुरवठा करून त्यांचे शेतीतील उत्पन्न वाढवणे आणि शेती सुखकर करणे हे आहे सिंचन उपयोगी साधन जसे ठिबक स्प्रिंकलर इलेक्ट्रिक मोटर पाईपलाईन सिंचन विहीर यासाठी 70 ते 80 टक्के अनुदान दिले जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपल्या गावातील नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना समितीचे सदस्य कृषी मित्र कृषी ताई व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून पूर्ण माहिती मिळेल आणि 21 जिल्ह्यातील ज्या गावांचे नावे या योजनेमध्ये आहे त्या गावातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात ऑनलाइन अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी पोखरा या साइटवर भेट देऊन आपण पूर्ण माहिती घेऊ शकतो. Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Yojana

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे..

https://dbt.mahapocra.gov.in/

“नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना” अर्ज कशा पद्धतीने करावा :-

नानाजी देशमुख कृषी संजीवनी  योजनेअंतर्गत  आपल्या राज्य सरकार द्वारे करण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीवर अवलंबून असते

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला खालील प्रमाणे पायऱ्यांचा वापर करून अर्ज करावा लागेल:

आपल्या राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईट किंवा नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना च्या अधिकृत वेबसाईट वर भेट देऊन आपण योजनेच्या अटी पात्रता निकष तपासू शकतो आणि अर्ज करू शकतो.

वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या योजनेसाठी अर्ज डाउनलोड करा आणि भरा.

आवश्यक कागदपत्रे ओळखीचा पुरावा वास्तव्याचा पुरावा आणि जमीन मालकी हक्क असलेला पुरावा.

भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे जवळच्या आणि स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करा.

तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर आणि पूर्ण झाल्याचे आढळल्यानंतर, तुम्हाला पुढील मार्गदर्शन दिले जाईल , यामध्ये तुमच्या शेताची तपासणी आणि प्रस्तावित तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक समाविष्ट असू शकते.

पुढील प्रक्रियेत विभागीय अनुदानाची रक्कम आणि योजना लागू करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री व पुढील निकष जारी केले जातील.

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया, कागदपत्रे आणि योजनेच्या इतर संबंधित निकष राज्य सरकारच्या कृषी विभागाने जारी केलेल्या विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचनांना अनुसरन करणे महत्त्वाचे आहे, कारण त्यामध्ये स्थानानुसार बदल असतो.

Tar Kumpan Yojana संपूर्ण शेताला तारेचे कुंपण करा, सरकार देत आहे 90% सबसिडी; या शेतकऱ्यांनी त्वरीत अर्ज करा-

Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Yojana  या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या बाबी :-

 

नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे :-

नानासाहेब देशमुख योजनेची सविस्तर माहिती प्रशासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Exit mobile version