agrinews24tas.com

Maratha reservation : मराठे मुंबईत धडकणार, 20 जानेवारीला मुंबईत भगवे वादळ, आझाद मैदानावर जरांगे पाटलांचे आमरण उपोषण.

Maratha reservation सरकारने अंतरवली सराटी येथे येऊन आपली राजकीय निती अवलंबू नये. सरकारने एकदा हा प्रयत्न केला होता त्याचे परिणाम पण सरकारने पाहिले आहेत असे बीड येथे झालेल्या भव्य सभेला संबोधित करताना जरांगे पाटील म्हणाले. छगन भुजबळ आणि राज्य सरकारला उद्देशून ते म्हणाले लवकरात लवकर मराठा आरक्षणावर तोडगा काढा अन्यथा 20 जानेवारीला आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे.

यांनी स्वतःचे हॉटेल स्वतः जाळून आमच्यावर आरोप केले. मराठ्यांनी शांततेत रॅली काढली होती. मराठे कधीच जाळपोळ करत नाही आणि करणार ही नाही.मराठ्याच्या पोरांना षडयंत्र रचून फसवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याचे खूपच गंभीर परिणाम होतील असे ते म्हणाले.

ते येवल्याच येडपट येऊन गोंधळ घालतंय मराठ्यांना विरोध करतय आणि सरकार त्यांचच ऐकत आहे. सरकारला माझी विनंती आहे हजारो माता भगिनी येथे उन्हातान्हात उपाशी पोटी बसलेले आहेत. सरकारने शहान्याची भूमिका घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावं. छगन भुजबळ यांचे ऐकू नये. प्रत्येक राज्यातील मोठा समुदाय दडपून टाकण्याचा प्रयत्न सध्या देशात सुरू आहे. आमच्या नादाला लागू नका नाहीतर तुम्हाला दाखवून देऊ मराठे काय चीज आहेत ते अश्या घणाघाती शब्दात त्यांनी सरकार वर टीका केली आहे.

आरक्षण मिळवण्याची एवढीच सुवर्ण संधी आहे, या संधीच सोन करा. जे सरकार आमच्या लेकरांसोबत आम्ही त्यांच्या सोबत, राजकीय नेते मत मागायला तुमच्या गावात येतील त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा. मराठे काय आहेत ते त्यांना दाखवून द्या तरच सरकार तुमचे ऐकून घेईल. जर सरकार ऐकत नसेल तर याचे परिणाम सरकारला मुंबईत 20 जानेवारीला पाहायला मिळतील असे जनतेला संबोधून बोलले.Maratha reservation

Oneplus Nord CE 3 Lite New Year offer चा मोबाईल घेऊन या फक्त 15 हजार रुपयांमध्ये नवीन वर्षाची बंपर ऑफर

Exit mobile version