agrinews24tas.com

लग्न करण्यासाठी योग्य वय किती असावं लागतं…. जाणून घ्या 🤔

 मुलींसाठी १८ते २३ वर्षे, मुलासाठी २१ते २७ वर्ष एकदम परफेक्ट आहे. (अजून वाचा….👇🏻)


जर मुलगा मुलगी नोकरीला असतील तर जास्तीत जास्त ३० च्या आतमध्ये.

२५ च्या आत जर तुम्ही स्थिरस्थावर असाल किंवा एखादी नोकरी, एखादा व्यवसाय, किंवा मासिक कमाईचे कुठलातरी कायमस्वरूपी स्रोत असेल तर काहीही अडचण येत नाही. गावाकडे अनेकाची लग्न २२/२३ व्या वर्षी होतात. माझ्या काॅलेज च्या बॅच किंवा आयटीआय च्या बॅच मधील बर्याच मित्रांची लग्न केव्हाच झालेत. काहींना तर १,१/२ मुलं पण आहेत.

आमच्या बॅच मध्ये सर्वांची वयं सारखी नव्हती. काॅलेज सुरू तेव्हा सर्वात लहान (२१मुलांपैकी) मी होतो. २ वर्षांचा आयटीआय पुर्ण झाल्यावर माझे वय २०१७ मध्ये १७ वर्ष होते काहींचे तेव्हा २१/२३ पण होते. डिप्लोमा, डिग्री करून आलेले.

आज १९ पैकी ९ जणांचे लग्न झालेत. त्यात काहींचे आज वय २४ वर्ष असेल. यातील सर्वच जण नोकरीला नाहीत पण बर्यापैकी कमावतात. काहीजण शेती करून सोबतच स्वतः ची इलेक्ट्रॉनिक्स दुकाने चालवतात. सर्व एकदम सुरळीत आहे.

माझ्या मामाच्या मुलाचे २०१८ मध्ये लग्न झाले तेव्हा वय २२ वर्ष होते. घरी कुटुंबापुरती शेती आहे. तो कधीच नोकरीच्या मागे लागला नाही. आज घरी एक ट्रॅक्टर, फोर व्हिलर, फळबाग गाई,वगैरे सर्व व्यवस्थित आहे. त्याची बायको पण एक टिपिकल गृहिणी आहे. दोघ मिळून शेती करतात. एक मुलगा व लहान मुलगी आहे.

खर तर वेल सेटल, फ्लॅट, गावी घर शेती, मुलाची नोकरी, बॅंक बॅलन्स हे सर्व एकाच मुलाकडे एका सर्वसाधारण मुलींच्या पालकांना कधीच भेटत नाही. एखाद्याला भेटतं म्हणून कस्तुरईमृगाप्रमाणे सर्वच त्यामागे धावत असतात. यामध्ये अनेक वेळा अपेक्षा वाढत जातात. मुलामुलींचे लग्नाचे वय वाढत जाते पण मनासारखे स्थळ मिळत नाही असेच सर्वजण म्हणतात.

जर एखाद्याला ४/५ एकर शेती आहे, चांगले घर जरी असे तरी काहींना त्यात हाव असते. मुलींच्या वाटते नोकरी हवीच परंतु नोकरी करणाऱ्या कडे नोकरी असते परंतु शेती नसते तरीही त्याला नकार मिळतोच की. 😚 हा नोकरीचा हट्ट अलीकडे एवढा पेटलाय की अगदी १२ वी पास मुलीच्या आईवडीलांना जाव ई नोकरीवाला पुणे किंवा शहरात राहणारा पाहिजे. अगदी यांची मोठे लग्न करायची ऐपत नसते.

मागील महिन्यात एक स्थळ आलेले. मुलगी १२ वी शिकलेली. माझ्या घरची शेती वगैरे सर्व बघून झाली. अगदी नवीन मोठे घर सुद्धा, घरी गाई व ७/८ शेळ्या आहेत. तिकडून लगेच कुजबुज आलीच मुलीला काम करावे लागेल, गाई आहेत. २ दिवसानंतर पहिल्याच स्थळाला मुलगी बघण्या पुर्वी नकार आला.

हल्ली मुलींची काम करण्याची मानसिकता राहिली नाही, सर्व काही आयते अपेक्षित आहे. त्यानंतर मी बायोडाटा बनवला. खाली नोकरीच्या जागी नोकरी नाही व्यवसाय आहे असा स्पष्ट उल्लेख केला. 🙏

Exit mobile version